- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एक २५ वर्षीय युवक व ३० वर्षीय युवकाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार १२ एप्रिलला पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.तुषार ढगे वय २५ वर्षे, व सिकंदर शेख वय ३० वर्षे दोघेही रा.हुंडा पिंपळगाव, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर(पूर्वीचे नाव अहमदनगर) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत.दोघेही चांगले मित्र असून त्यांनी टोकाचे पाऊल कां उचलले? याचा तपास एमआयडीसी भोसरी पोलिस प्रशासन करीत आहेत.पोलीस सूत्रांनुसार,दोघेही मित्र काल,शुक्रवारी पुण्यात काही कामानिमित्त गेले होते.त्यातच पिंपरी चिंचवड येथील मोर्शी भागातील भारतमाता चौक खिरीड वस्ती भागात आज शनिवारी दोघांनीही एका झाडाला एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच घटनेची माहिती लगेच एमआयडीसी भोसरी पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

