Monday, August 17, 2026
Homeनागपूरउष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केल्याने काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले,वृद्ध आणि कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.त्याचबरोबर,विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या,शनिवार १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.अश्यातच हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास पुढील काही दिवस आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.कुमार आशीर्वाद यांनी नुकताच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.यापूर्वी ते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.तत्पूर्वी ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!