Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीउमेद अभियानातील बचत गट आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर 

उमेद अभियानातील बचत गट आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- उमेद अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी कर्ज योजना राबविली जाते.सदर अभियनांतर्गत गडचिरोली जिल्यातील अनेक बचत गटांना दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येत आहे.यामुळे जिल्ह्यातील अनेक महिला आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रशासनाच्या वतीने जनजागृती करुन महिला बचत गटांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला जिल्ह्यातील काही महिला बचत गटांनी प्रतिसाद देत अर्ज दाखल केले.दस्ताऐवजाची पडताळणी झाल्यानंतर बँकामार्फत जवळपास १०० कोटींवर कर्जाचे वितरण करण्यात आले होते.यंदाही शासन व प्रशासनाच्या पुढाकाराने उमेद अभियान व बँकांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील बचत गटांना कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.तीन हजारावर बचत गटांची नोंद जिल्ह्यातील महिला बचत

गटाच्या आकडेवारींची माहिती डीआरडीए तसेच उमेद अभियान आणि माविमकडे आहे.ग्रामीण व शहरी भाग मिळून तीन हजारापेक्षा अधिक महिला बचत गट जिल्ह्यात आहेत.या बतच गटांना उमेद अभियानांतर्गत कर्ज वितरण करुन महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

उमेद अभियानांतर्गत बचत गटांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, शिविर आयोजित करुन कर्ज प्रकरणे निकाली काढणे,त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येते.या कर्जाच्या माध्यमातून काही बचत गटांनी छोटे-मोठे उद्योग सुरु केले आहे. या उद्योगाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला आहे.

ज्या बचत गटांना कर्ज हवे आहे; अशा गटाच्या अध्यक्ष व सचिवांनी उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक, माविम किवा बँकाकडे संपर्क साधावा.मार्गदर्शन मिळाल्यानंतर दस्ताऐवजासह अर्ज करावा लागतो. दस्ताऐवजाची पडताळणी झाल्यानंतर बँकामार्फत कर्ज प्रकरण मंजूर करुन,कर्जाची रक्कम गटाच्या खात्यात जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!