Tuesday, June 16, 2026
Homeनागपूरउद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

उद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्या,बुधवार ३ डिसेंबर होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केली आहे. येत्या २० डिसेंबरला उर्वरित ठिकाणी मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निकाल,निवडणूक पुढे जात आहेत.ही काही योग्य पद्धत नाही.निवडणूक आयोग,खंडपीठ स्वायत्त आहे,त्यामुळे ते मान्य करावे लागेल.पण यातून भ्रमनिरास होतो.काही चूक नसतांना असे होणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २४ नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती.ही निवडणूक २० डिसेंबरला होणार होती.त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २४ नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो,अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.याबाबतचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.आज मतदान झाले तरी त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील.तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत  निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील,असे न्यायालयाने स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हायकोर्टाच्या निकालावर भाष्य करतांना म्हटले की, “मी निकाल वाचलेला नाही.पण जर खंडपीठाने निर्णय दिला असेल तर तो मान्य करावा लागेल.पण जवळपास गेली २५ ते ३० वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण असे पहिल्यांदा घडत आहे की,घोषित केलेल्या निवडणुका,त्यांचे निकाल पुढे चालले आहेत.ही पद्धत  योग्य वाटत नाही.अर्थात खंडपीठ स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल”. “जिथे सगळ्या गोष्टींचे पालन झाले आहे तिथे कोणीतरी कोर्टात गेले. कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही.पण फक्त कोर्टात गेल्याने निवडणुका पुढे नेणे हे कोणत्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचे घडले आहे.मी त्याबाबत अधिक बोलणार नाही.मी यासंदर्भात वैयक्तिक नाराजी आधीही प्रकट केली असून,ती निवडणूक आयोगावर नसून कायद्यावर आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.”फक्त २४ ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत,म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणे मला तरी योग्य वाटत नाही,” असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!