Wednesday, September 2, 2026
Homeनवी दिल्लीउद्याला सादर होणार अंतरिम बजेट -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार बजेट सादर

उद्याला सादर होणार अंतरिम बजेट -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार बजेट सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-  केंद्र सरकारचे अंतरिम बजेट १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.खरे तर,अर्थमंत्री संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार नसून, कामकाजाचा लेखाजोखा तेवढा मांडतील आणि सरकारच्या उर्वरित कालावधीकरिता खर्चासाठी संसदेची मंजुरी घेतील, याला अंतरिम बजेट असे म्हणतात.देशाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा.पैसा कोठून येणार आणि सरकार तो कुठे व कसा खर्च करणार याचा हा एक आराखडा असतो.वार्षिक आर्थिक विवरण असेही त्याला म्हणतात.अंतरिम अर्थसंकल्प मात्र सध्याच्या सरकारला नवीन सरकार येईपर्यंत आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत देश चालवण्यासाठी पैसे पुरवतो.निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा माजी अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी त्या करणार आहेत. सीतारामन यांनी सलग ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.सहाव्यांदा त्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील आणि माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग,अरुण जेटली,पी.चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनाही सीतारामन मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते.मोरारजीभाई देसाई यांनी १९५९-१९६४ दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.पुढेही देसाई अर्थमंत्री झाले होते आणि त्यांच्या नावावर सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!