Thursday, July 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल उद्या, शनिवार २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल,तसेच त्याची छायांकित प्रत घेता येणार आहे.यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. सीबीएसई,सीआयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य मंडळाच्या निकालाकडे लागले होते.विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक...

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी विविध कर्ज व व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज आता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!