- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रियकराने तरुणीवर बलात्कार करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केला.त्यानंतर त्याने मृतदेह बसस्थानकावर टाकून देऊन पसार झाला.परिसरात काल,सोमवारी १८ नोव्हेंबरच्या सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.याप्रकरणी उमरेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.बदललेले नाव सारिका वय २६ वर्षे,रा.उमरेड असे खून झालेल्या तरुणीचे,तर लोकेश जुगनाके वय ३० वर्षे,रा.अड्याळ,ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे पसार आरोपीचे नाव आहे.
सारिका ही उमरेडमध्ये बीएसडब्ल्यू पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती.तिचे इन्स्टाग्रामवरून लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले होते.लोकेश एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो.दोघेही दीड वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते.यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.दोघांच्या वेळोवेळी भेटी होत होत्या.सारिकाला लोकेशने लग्नाचे आमिष दाखविले होते.नवीन वर्षात दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे सारिका खूश होती.रविवारी लोकेशने तिला फिरायला जाण्यासाठी आग्रह केला.तिनेही होकार दिला.रविवारी सकाळी ८ वाजता सारिका कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली होती.रस्त्यात तिला लोकेश भेटला.दुपार होऊनही मुलगी घरी न आल्याने आईने दुपारी दोन वाजता तिला फोन केला.तिने उत्तर न दिल्याने तिच्या मावशीने तिला फोन केला असता,तिने मी कॅम्पसाठी ब्रम्हपुरीला आल्याचे सांगितले.रात्र होऊनही मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आईने सायंकाळी ७.३० वाजता सारिकाला फोन केला असता,तिने मी घरी येणार नसल्याचे सांगितले.यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा मित्र लोकेश बोलतो व मी तिला घरी आणून देईन,असे सांगितले.काही वेळानंतर फोन बंद झाला.त्यानंतर दोघेही एमआयडीसीकडे जाणाऱ्या महामार्गाने दुचाकीने फिरायला गेले होते.रात्र होताच सारिकाने त्याला घरी सोडण्यास सांगितले.मात्र,लोकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते.लोकेशने तिला महामार्गावरील बसस्टॉपवर नेले.तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र,नकार दिल्यामुळे लोकेशने तिच्याशी बळबजरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या प्रकारामुळे सारिकाला संताप आला.यावरून त्यांच्यात वाद झाला.रागाच्या भरात लोकेशने सारिकाचा ओढणीने गळा आवळून खून केला.तिचा मृतदेह बसस्थानकामध्ये फेकून त्याने पळ काढला.मिळालेल्या माहितीवरून,पोलिसांनी सारिकाच्या मोबाइलचा सीडीआर काढला.तिच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन ब्रम्हपुरी परिसर असल्याची माहिती प्राप्त झाली.उमरेड पोलिसांना ११२ वरून मिळालेल्या माहितीवरून काल,सोमवारी सकाळी १० वाजता दिव्याचा मृतदेह उमरेड एमआयडीसी परिसरातील बसस्थानकावर आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांना तिच्याजवळ चाकू,बॅग,घरून नेलेला टिफीन जसाचा तसा मिळाला,पोलिसांनी तिचा मृतदेह उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता पाठविला. शवविच्छेदन न झाल्याने तिचा मृतदेह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. घटनेची माहिती मिळताच संजय मेश्राम,तक्षशीला वाघधरे,जाईबुनिसा शेख,योगिता इटनकर,भीमराव गजभिये यांनी तिथे पोहोचून आरोपीला अटक करण्याची मागणी केली.घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन,पोलीस निरीक्षक धनाजी जळत यांनी घटनास्थळाला भेट दिली.याप्रकरणी ठाणेदार धनाजी जळक यांनी आरोपीवर हत्याकांड आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला.फरार आरोपी लोकेशच्या शोधासाठी पथके रवाना केली.घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रामटेके करीत आहेत.
हातावर लिहिली आपबिती👇
दिव्याने शारीरिक संबंधास नकार देत घरी नेऊन मागितले होते.मात्र,लोकेशने तिच्यावर बलात्कार केला.त्यामुळे ती दुःखी झाली. ‘लोकेशने माझा रेप केला.त्याला शिक्षा झालीच पाहिजे.त्याने माझा विश्वासघात केला.मी प्रेम केले,पण त्याने माझ्यावर फक्त शारीरिक संबंधासाठी प्रेम केले,’ असे दिव्याने हातावर पेनाने लिहून ठेवले आहे; अशी माहिती पोलिसांनी दिली.
- Advertisement -