- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटिहाडोह धरण परिसरात आपल्या काकासोबत फिरण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर परतीच्या वाटेवर असतांना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवून चिमुकल्याच्या गळ्याला पकडून जवळपास शंभर फूट अंतरावर फरफटत नेल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.यात ४ वर्षीय विहान भौतोष रॉय रा.दिनकरनगर,ता.अर्जुनी-मोरगाव असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव असून त्याला तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणात जोरदार पाऊस पडल्याने धरण शंभर टक्के भरला असून, ओव्हरफ्लो होऊ लागला आहे.त्यामुळे परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने धरणातील विहंगम दृश्य बघण्याकरिता जात असतात.अश्याच प्रकारे काल शनिवारी विहान व त्याचे काका अजय सरदार हे इटिहाडोह धरणातील विहंगम दृश्य बघण्याकरिता गेले होते.धरण बघितल्यानंतर विहान व त्याचे काका अजय हे गावी दिनकरनगरला जाण्यासाठी निघाले होते.अश्यातच काही अंतरापर्यंत पायी चालत जात असतांनाच विश्रामगृहाजवळील झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विहानवर हल्ला चढवला आणि पायाला व नंतर गळ्याला पकडून जवळपास शंभर फूट जंगल परिसरात ओढत नेले.गर्दीचे ठिकाण असल्याने घटनास्थळी असलेल्या पर्यटकांनी आरडाओरड केली. आरडाओरड करताच बिबट्याने विहानला सोडून दिले व जंगलात पळ काढला.यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून उपस्थित पर्यटकांमुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या विहानवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
- Advertisement -

