Friday, July 24, 2026
Homeमुंबईआम्ही विधानसभा निवडणूक एकत्र लढवू- वर्षा गायकवाड-येत्या ७ ऑगस्ट रोजी ठरणार महाविकास...

आम्ही विधानसभा निवडणूक एकत्र लढवू- वर्षा गायकवाड-येत्या ७ ऑगस्ट रोजी ठरणार महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठक आज ४ ऑगस्टला मुंबईत पार पडल्या.बैठकीत काँग्रेस पक्षाने ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीतील जागावाटपा बाबत रणनीती ठरवली.

लोकसभा निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे.त्यामुळे काँग्रेस सातत्याने जास्त जागांची मागणी करत आहे.सूत्रांच्या  माहितीनुसार,काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी ११०-१२० जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे.विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर बाबींवर ७ ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.शिवसेना (यूबीटी),काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तिन्ही प्रमुख पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा यात समावेश असेल.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी मुंबईत मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसची बैठक झाली.या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीतील पक्षाची रणनीती आणि मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

ते पुढे म्हणाले की,मुंबईबाबत उद्धव ठाकरेंशी बोललो आहे.चर्चेची फेरी नुकतीच सुरू झाली आहे.आम्ही एकत्र निवडणूक लढवू.या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात,वर्षा गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४८ पैकी ९ जागा जिंकल्या.आघाडीचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने एक जागा जिंकली.शिवसेनेने (शिंदे गट) ७ जागा जिंकल्या.इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या काँग्रेसने १३ जागा जिंकल्या. शिवसेनेने (यूबीटी) ९ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनी ८ जागा जिंकल्या तर सांगलीत अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!