- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्याच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित घाटी येथील धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन आज, शुक्रवारी २९ नोव्हेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते पार पडले.प्रसंगी तब्बल १० वर्षांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रास नवे आमदार लाभल्याने संस्थेच्या वतीने आमदार मसराम यांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी वर्गांची होणारी लुट थांबविण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभाव धान खरेदी केन्द्र सुरु करावे; अशी मागणी यापूर्वी आमदार मसराम मसराम यांनी केली होती.देसाईगंज तालुक्यात इटियाडोह प्रकल्पाच्या माध्यमातुन सिंचनाची सोय तसेच मोटार पंपाच्या माध्यमातुन रब्बी धान पिकाची लागवड आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली.विद्युत पुरवठ्याची सोय व्हावी; यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन थकित बिलाचा भरणा केला होता.कुरखेडा,कोरची तालुक्यात अपुऱ्या विज पुरवठ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पिक धोक्यात आले होते.असे असतांनाही धानाची मळणी सुरु होऊनही शासनाने हमीभाव खरेदी केन्द्रे सुरु केली नव्हती.त्यामुळे धान्य व्यापारी शेतकऱ्यांचे धान कमी भावाने खरेदी करीत असल्याने शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरु असल्याचे मसराम यांनी पत्रकाद्वारे शासनास कळविले होते.त्यानुसार सध्या स्थितीत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याने जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी धान खरेदी केंद्रांचा लाभ घ्यावा; असे घाटी येथील धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आमदार मसराम यांनी आवाहन केले.
धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,कुरखेडा काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, संस्थेचे अध्यक्ष मोतीराम नाईक,संस्थेचे सचिव गिरीधर मदनकर,माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.
- Advertisement -