उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- आमदार,खासदारांना पेन्शन मिळते मग शिक्षक व कर्माचाऱ्यांना का नाकारली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून भाजपला नागपूर विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धडा शिकवा,असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत नेत्यांनी केले.
नागपूर विभाग शिक्षक मतदरसंघाचे आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या प्रचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात बुधवारी आघाडीची सभा घेण्यात आली.सभेला शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत,खासदार बाळू धानोरकर, आमदार मनीषा कायंदे,आमदार अभिजित वंजारी,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे, शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख,गंगाधर नाकाडे, किशोर हरडे, किशोर कुमेरिया गोडबोले उपस्थित होते. विनाय म्हणाले, नाशिकमध्ये निवडणुकिट उभा करायला उमेदवार सापडला नाही आणि आपणच नंबर वन असल्याचा दावा करणारी भाजप राजाकरणातील लोकांना पळवणारी टोळी आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका कतरताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची प्रशांश केली. गडकरी आणि मुंडे यांनी युती कायम राखण्याचे काम केले. मात्र चांगले काम करीत असलेल्या गडकरींचे पंख छाटण्याचे काम केंद्र सरकारतर्फे केले जात असल्याचे राऊत म्हणाले.

