- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे व खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा रंगल्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे.त्यामुळे स्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व स्वतः संजय राऊत यांनी पुढे येत ही बातमी पेरण्यात आल्याचा दावा केला आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस व ठाकरे गटात जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे.काँग्रेस ठाकरे गटाला हव्या त्या जागा देण्यास तयार नाही. विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिकाही अनेकांना मान्य नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कंटाळून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची व संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी फोनवरून चर्चा केल्याचा दावा ‘एबीपी माझा’
या मराठी वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली.त्यानंतर कांग्रेसने तात्काळ पुढाकार घेत हे वृत्त फेटाळून लावत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे स्पष्ट केले.सदर बातमी १ टक्काही खरी नाही.काँग्रेस व ठाकरे गटात तणाव वाढवण्यासाठी भाजपने या बातम्या पेरल्या आहेत.पण आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे,तो तुटणार नाही;असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतीही भेट झाली नाही. भाजपकडून आमच्यात वाद निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.कारण, भाजपची प्रचंड घाबरगुंडी उडाली आहे.संजय राऊत यांना तुरुंगात कुणी पाठवले? त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झाली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडी बरोबर आहे.संजय राऊत व अमित शहांतील कथित चर्चेवरही आमची हायकमांडशी कोणतीही चर्चा झाली नाही.आमच्यातील जागावाटपाचा पेच जवळपास संपला आहे. मंगळवारपर्यंत सर्वकाही सुरुळीत होईल,असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
- Advertisement -

