- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-पैश्याची लालच अनेकांना चोर बनवून सोडते.त्यातच घरची सूनच घरच्यांच्या पैश्यावर डल्ला मारत असेल तर..अशीच घटना गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारी येथे नुकतीच उघडकीस आली आहे.चक्क सख्ख्या सुनेने माजी सरपंच असलेल्या सासूचे आलमारीतून ४२ हजार रुपये रोख चोरले.सून एवढ्यावरच थांबली नाही तर याची वाच्यता कुणालाही होऊ नये म्हणून चोरलेली रक्कम शेजारच्या घरी ठेवली.यामिनी लक्की तावाडे वय २४ वर्षे,रा.खमारी असे पैसे चोरलेल्या आरोपी सुनेचे नाव आहे.प्रकरणी यामिनी हिच्यावर सासूने दिलेल्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ मार्चला गोंदिया ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,४८ वर्षीय खमारी येथील माजी सरपंच विमला मोहन तावाडे यांनी त्यांच्या बेडरूमच्या गोदरेज आलमारीचे लॉकरमध्ये ४२ हजार रुपये रोख ठेवली होती.अशातच ३ मार्चला विमला यांनी गोदरेजच्या आलमारीचे लॉकर उघडुन पाहिले असता, त्यातील रोख रक्कम आढळून न आल्याने गोंदिया ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी सर्वप्रथम संशयित व्यक्तींची चौकशी केली.त्यानुसार विमला यांच्या सुनेवर दाट संशय बळवल्याने फोडभक्ती केली.फोड-भक्तिनुसार सून यामिनी हिनेच ४२ हजार रुपये रोख नेत सदरची रक्कम शेजारच्या घरी ठेवली.पोलिसांनी ती रक्कम शेजारच्या घरातून जप्त केली.घटनेसंदर्भात ४ मार्च रोजी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी यामिनी तावाडेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भुते करीत आहेत.
- Advertisement -

