Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआता शेतकऱ्यांना खतांची माहिती मिळणार एका क्लिकवर.. - खतांचा साठा,खतांचे प्रकार व...

आता शेतकऱ्यांना खतांची माहिती मिळणार एका क्लिकवर.. – खतांचा साठा,खतांचे प्रकार व केंद्र चालकांचे मोबाईल क्रमांक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घरबसल्या,सहज आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने Blogspot या सुलभ व लोकप्रिय माध्यमाचा वापर करून ‘खते माहिती प्रणाली’ कार्यान्वित केली असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीमती किरण खोमणे यांनी दिली आहे.जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात विविध प्रकारच्या अनुदानित रासायनिक खतांची विक्री केली जाते. मात्र,अनेकदा शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता वेळेवर समजत नसल्याने त्यांचा वेळ,पैसा व श्रम वाया जातात.याच पार्श्वभूमीवर,कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी एक प्रगत,पारदर्शक व डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
  • एक क्लिक करा आणि पहा संपूर्ण माहिती👇 
वरील लिंक ब्लॉगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या खतांचा साठा,खतांचे प्रकार,केंद्र चालकांचे मोबाईल क्रमांक यांसह इतर आवश्यक माहिती सहजपणे मिळू शकते.ही माहिती जिल्हानिहाय,तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय स्वरूपात दररोज अद्ययावत करण्यात येते.
या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून शेतकरी खत खरेदीचे अचूक नियोजन करू शकतात आणि गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करू शकतात.ब्लॉगपेज वापरणे अत्यंत सुलभ असून,कोणतेही ॲप डाऊनलोड न करता हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत चालू शकते. ही माहिती संपूर्णतः पारदर्शक असून सार्वजनिक वापरासाठी खुली आहे.
  • किरण खोमणे,जिल्हा कृषी विकास अधिकारी👇
डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.या उपक्रमामुळे खत खरेदी सुलभ होणार असून,शेतकऱ्यांचा वेळ,पैसा व श्रम वाचणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!