Friday, June 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला बसणार चाप..!

आता शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला बसणार चाप..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-यापूर्वी खासगी शाळांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनात येईल ते शुल्क विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वसूल केले जायचे.सध्या स्थितीत काही इंग्रजी माध्यम शाळांमध्ये वार्षिक शुल्क ८० हजार ते १ लाखापेक्षा अधिकचे आहे.ग्रामीण शाळांमध्येही ४० ते ६० हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते.याशिवाय पुस्तके,युनिफॉर्म आणि इतर फी जोडली जाते.विशेष म्हणजे,शाळांना १० टक्क्यांपर्यंतच शुल्कवाढीची मर्यादा आहे.मात्र,काही शाळा २५ ते ३० टक्के शुल्कवाढ करून अनेकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता खासगी शाळांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप लावला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने विभागीय शुल्क नियामक समित्या कार्यान्वित केल्या आहेत. ‘महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११’नुसार राज्य आणि विभागीय शुल्क नियामक समितीचे अध्यक्ष आणि पदसिद्ध सदस्य सचिव यांची नियुक्ती अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आली असून,खासगी शाळांच्या मनमानी आणि अवाजवी शुल्क आकारणीविरोधात आता पालकांना समितीकडे दाद मागता येणार आहे.त्यानुसार,विविध जिल्ह्यातील पालक आता शाळांच्या मनमानी शुल्कवाढीविरोधात समितीकडे दाद मागू शकतील. यामुळे शाळांच्या लुटीला आळा बसणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने विभागीय शुल्क नियामक समिती,पुनरीक्षण समिती अधिसूचनेद्वारे नियुक्त केली आहे.त्यानुसार,उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम. जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील पुनरीक्षण समितीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हे पदसिद्ध सदस्य सचिव असणार आहेत. तसेच,पुणे,मुंबई,नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय शुल्क नियामक समिती नियुक्त करण्यात आली आहे.त्यात सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश हे समितीचे अध्यक्ष,तर विभागीय शिक्षण उपसंचालक हे पदसिद्ध सदस्य-सचिव आहेत.सर्व शाळांना समितीची वेबसाइट नोटिस बोर्डवर लावावे लागेल.शुल्क पावतीवर संपर्क क्रमांक छापणे सक्तीचे असून उल्लंघन झाल्यास दंड आकारला जाणार आहे.समिती शुल्कवाढीची पडताळणी करेल आणि नियमबाह्य वाढ रद्द करेल.
  • शुल्कवाढीविरोधात संपर्क👇
नागपूर विभागीय शुल्क नियामक समिती,सिव्हिल लाईन्स,नागपूर ईमेल : feecontrol.nagpur@education.
maharashtra.gov.in
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!