Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वाघ आल्याची माहिती देणार एआय बेस कॅमेरे..

आता वाघ आल्याची माहिती देणार एआय बेस कॅमेरे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्याचे युग हे स्पर्धेसह तंत्रज्ञानाचे युग आहे.त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये वाघांचे प्रमाण वाढल्याने वाघ शिकारीच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागलेत.त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढून अनेकांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावे लागले आहे. यासाठी राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून व्याघ्र प्रकल्पांमध्ये एआय (AI)बेस तंत्रज्ञयुक्त आधारित ९०० कॅमेरे बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच जंगल परिसरात हे कॅमेरे असणार आहेत. एखादा वाघ किंवा बिबट्या गावाकडे किंवा खाजगी जागेत दिसेल तेव्हा हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावातील आलाराम वाजेल.ही टेक्नॉलॉजी लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे.हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळणार आहे,असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत मार्वल कंपनीसोबत सरकारचा करार करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!