Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता रेशन कार्ड हरवल्यास मिळणार ऑनलाईन ई- रेशन कार्ड...

आता रेशन कार्ड हरवल्यास मिळणार ऑनलाईन ई- रेशन कार्ड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- सरकारी स्वस्त धान्यासाठी तयार केलेले रेशन कार्ड हरवल्यास आता शासनाकडून ई- रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने एक नवी प्रणाली तयार केली. या प्रणालीचा वापर करून प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ई-रेशन कार्ड तयार करता येते; अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड योजनेचा फायदा कित्येक गरीब कुटुंबीयांना होत आहे.आता जुने रेशन कार्ड हरवल्यास त्या जागी ई- रेशन कार्ड सुरू करण्यात आले.त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई-रेशन कार्डद्वारे धान्य खरेदी करता येणार आहे.ई- रेशन कार्डमुळे कार्डमधील नाव कमी करणे,नोंदवणे,ट्रान्सफर करणे, अशी कामे करण्यासही मदत होणार आहे.राज्यात ई- रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली.पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सर्व रेशन कार्ड ई-कार्डमध्ये रूपांतरित करण्याची तयारी झाली.यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली.पुरवठा विभागात प्रायोगिक स्तरावर या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.
शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालय किंवा किओस्क सेंटरमधून अर्ज मिळेल.दिलेल्या लिंकवरून डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी अर्ज डाउनलोड करू शकता.रेशन कार्ड डुप्लिकेट फॉर्म पीडीएफ हा फॉर्म फूड सेफ्टी पोर्टलवर मिळवू शकता. अर्ज प्राप्त केल्यानंतर,तो अर्ज काळजीपूर्वक भरा.रेशन कार्ड क्रमांक,शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबप्रमुखाचे नाव,वडील व आईचे नाव,मोबाइल नंबर इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
यापूर्वी जुन्या रेशन कार्डबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या.जुने रेशन कार्ड असल्यामुळे ते मळकट होणे,हरवणे,फाटणे,त्यावरील नावे पुसून जाणे,अशा कित्येक गोष्टी रेशनधारकांना अडचणीच्या ठरत होत्या.या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नोंद घ्यावी यासाठी ई-रेशन कार्ड प्रणाली सुरू झाली आहे.याचा फायदा नागरिकांना होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!