Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाकृषी विभागाच्या ९ भरारी पथकाद्वारे १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..

कृषी विभागाच्या ९ भरारी पथकाद्वारे १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे,खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत.तसेच जिल्ह्यामध्ये २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे.सदर गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राच्या अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे.कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे,नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे,शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे,साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे,रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषि निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणांमुळे १० निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे,रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल,असा इशारा त्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते,बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी.खरेदी करतांना कृषी सेवा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे; त्यावरील नमुद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.तसेच एमआरपी पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३,खत नियंत्रण आदेश १९८५,अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५, किटकनाशक कायदा १९६८, किटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी कळविले आहे.
 
यांच्यावर करण्यात आली कारवाई👇
 
पांढराबोडी येथील श्री गणेश कृषि केंद्राचा बियाणे परवाना १ महिन्याकरिता,दासगावच्या माँ अंबे कृषि केंद्राचा बियाणे परवाना ६ महिन्याकरिता,सडक अर्जुनीच्या बाम्हणी येथील किसान क्रांती कृषी सेवा केंद्राचा परवाना २ महिन्याकरिता, सालेकसाच्या गोवारीटोला येथील नागपुरे ॲग्रो एजंसीचा किटकनाशके परवाना १ महिन्याकरीता, झालियाच्या किसान सेवा कृषि केंदाचा किटकनाशके परवाना १ महिन्याकरिता,तिरोडाच्या नवेझरी येथील आरोही कृषी केंद्राचा किटकनाशके परवाना १ महिन्याकरिता, तिरोडाच्या नवेझरी येथील यशोदा कृषी केंद्राचा किटकनाशके परवाना २ महिन्याकरीता,गुर्वेश ट्रेडर्स व धामणगावच्या कृषी सेवा केंद्राचा किटकनाशके परवाना ४ महिन्याकरीता,ओवाराच्या येरणे कृषी केंद्राचा खत परवाना ६ महिन्याकरिता,वडदच्या ठाकरे कृषी केंद्राचा खत परवाना २ महिन्याकरीता असे एकूण १० परवाने निलंबित करण्यात आले आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!