Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता थेट शेतात घेऊन जाता येणार मोठी कृषि अवजारे.. - रस्त्यांचे तंटे...

आता थेट शेतात घेऊन जाता येणार मोठी कृषि अवजारे.. – रस्त्यांचे तंटे मिटणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतीच्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये नेहमी वाद होत असतात.वादाचे अवसान हाणामारीत होऊन अनेकदा पोलीस ठाणे गाठावे लागते.अश्यातच शेत रस्त्याची हजारो प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहून बऱ्याचदा शेतकऱ्यांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.यासाठी राज्य सरकारने शेतीच्या रस्त्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे १२ फुटांचा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वातील महसूल खात्याने घेतलेल्या या निर्णयामुळे आधुनिक शेतीला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सरकारच्या शासनादेशानुसार,प्रस्तुत निर्णयामुळे आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,हार्वेस्टर यासारखी मोठी कृषि अवजारे थेट शेतात घेऊन जाता येणार आहेत.शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेत रस्त्यांशी संबंधित तंटे मिटवण्यासाठी ९० दिवसांच्या आत या रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहे.सरकारच्या आदेशानुसार,शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे (उदा.ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,हार्वेस्टर, इत्यादी) यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता,स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी,प्राधिकारी यांनी तपासणी करुन पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान ३ ते ४ मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन द्यावेत.
शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी.अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा,इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी.शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा.सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करुन देणे शक्य नसेल,परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा,जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार ३ ते ४ मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करुन देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करुन द्यावा.बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देतांना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे.रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी,परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे.तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी, जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही.सातबारा उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल,तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल.सबब,सातबारा उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी,प्राधिकारी यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता गडचिरोलीतच मिळू लागले उच्च दर्जाचे मोफत उपचार; दोन गुंतागुंतीच्या ‘ओव्हेरियन ट्युमर’ शस्त्रक्रिया यशस्वी..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर (Malignancy)आणि इतर गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्याच्या...

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा...

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!