मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला आहे.त्यातच आज,सोमवार १७ मार्चला राज्यातील नव्या वाळू धोरणाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.सर्वप्रथम भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाळू धोरणाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर नव्या वाळू धोरणानुसार अर्ज केल्यापासून १५ दिवसांत तहसीलदारांनी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत आहोत.१५ दिवसांत वाळू उपलब्ध न केल्यास तहसीलदारांवर कारवाई केली जाईल.नव्या वाळू धोरणात हे नमूद असेल,तसेच तक्रारीसाठी निश्चित एक पोर्टल तयार केले जाईल, अशीही माहिती बावनकुळे यांनी दिली.येत्या ८ दिवसांत नवे वाळू धोरण लागू करण्यात येणार असून घरकुलांना ५ ब्रास मोफत वाळू दिली जाईल,असेही त्यांनी म्हटले.भंडारा जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकारी बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागत असल्याचाही प्रश्न उपस्थित झाला होता.त्यावर, संपूर्ण अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली आहे, त्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करू,असे आदेशच महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बोलून गृह खात्याचीही चौकशी लावू,असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक