Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआठ तास काम,आठ तास कुटुंबासाठी आणि आठ तास विश्रांतीसाठी असतांनाच आता कामगारांना...

आठ तास काम,आठ तास कुटुंबासाठी आणि आठ तास विश्रांतीसाठी असतांनाच आता कामगारांना १२ तास काम.. – कामगारांची पिळवणूक करणारा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या दुकानात वा एखाद्या कंपनीत काम करणारा व्यक्ती हा कोणत्या लोकप्रतिनिधींचा वा मंत्र्यांचा मुलगा वा कुटुंबातील सदस्यांचा नसतो.काम करणारा हा गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असतो.यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या कल्याणासाठी कामाचे आठ तास निश्चित केले होते.१९४२ मध्ये व्हाईसरॉय कौन्सिलवर कामगार सदस्य म्हणून त्यांनी आठ तासांच्या कामाची मागणी केली. त्यानंतर १९४८ च्या फॅक्टरीज ॲक्टमध्ये हे आठ तास कायदेशीररित्या लागू झाले.अश्यातच आता महाराष्ट्र राज्य सरकारने बुधवार ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुकाने व कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या तासांत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांच्या घटनात्मक हक्कांवरच घाला घालण्यात आला आहे. राज्य सरकारने कामाचे तास वाढवून कामगारांचे शोषण करण्याची मालकांना संधी दिली असल्याने घेतलेल्या निर्णयाला राज्यातील कामगार संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.सदरचा निर्णय कामगारांची पिळवणूक करणारा असून भांडवलदारांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे.हा बदल घटनेला धरून नसून तो बेकायदेशीर आहे,असा आरोप संघटनांनी केलेला आहे.उद्योगांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारने बुधवार ३ सप्टेंबर रोजी दुकाने व कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या तासांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.त्यानुसार दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास यापुढे प्रतिदिन ९ तास,तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास प्रतिदिन १२ तास काम करावे लागणार आहे.तसेच विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासांनंतर ३० मिनिटे होता,तो आता ६ तासांनंतर ३० मिनिटे करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला आयटकचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रकाश रेड्डी यांनी जोरदार विरोध केला आहे.सरकारचा हा निर्णय भांडवलदार आणि मोठ्या दुकानदारांना सर्व सवलती देऊन कामगारांची पिळवणूक करणारा आहे.वास्तविक आठ तास काम, आठ तास कुटुंबासाठी आणि आठ तास झोपेसाठी हे आंतरराष्ट्रीय तत्त्व लागू झालेले असतांनाच या निर्णयामुळे कामगारांचे विश्वच नष्ट होईल,असे रेड्डी म्हणाले.आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाचे तास कमी करण्याचे धोरण आखले जात असतांना राज्य सरकार कामगारांच्या कामाच्या तासांत वाढ करण्याच्या गोष्टी करत आहे.दुसरीकडे त्यानुसार पगार वाढवून दिला जात नाही,अशी नाराजी कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!