Monday, May 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पहाटे अडीच तास सुरक्षा दल आणि नक्षल चकमक; ८ नक्षलिंचा खात्मा.....

आज पहाटे अडीच तास सुरक्षा दल आणि नक्षल चकमक; ८ नक्षलिंचा खात्मा.. – घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छतीसगड,गडचिरोली नंतर आता झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील लुगू आणि झुमरा टेकडी परिसरात आज,सोमवार २१ एप्रिलला पहाटे साडेपाचच्या सुमारास तब्बल अडीच तास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून शोधमोहीम सुरूच आहे.त्यामुळे नक्षलवाद्यांच्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल, एक एसएलआर,एक पिस्तूल आणि ८ देशी बनावटीच्या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिस दल यांना लुगू आणि झुमरा टेकडी परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची गुपित माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सोमवारी शोधमोहीम राबवित असतांना नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.नक्षलवाद्यांच्या प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनिही गोळीबार सुरू केला.कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाची २०९ कोब्रा बटालियन आणि राज्य पोलिस सहभागी होते.सुरक्षा दलाचा वाढता प्रभाव पाहून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. शोधमिहिमेदरम्यान,८ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून अन्य नक्षलींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी विवेक देखील चकमकीत मारला गेल्याचे झारखंडचे डीजीपी यांचे म्हणणे आहे.सद्या चकमक थांबली असून शोधमोहीम सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!