Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीआज जागतिक क्षयरोग दिन; संपूर्ण देशात दररोज ५ हजार लोकांना क्षयरोगाची लागण.....

आज जागतिक क्षयरोग दिन; संपूर्ण देशात दररोज ५ हजार लोकांना क्षयरोगाची लागण.. – दर दिड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.राबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायकोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसीस या जिवाणूचा शोध लावला,म्हणून २४ मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. सन १९०५ मध्ये त्यांना औषध शास्त्रामधील उत्कृष्ठ कामगीरी बद्दल मानाचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे.या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्तरावर अथक प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये राष्ट्रिय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यामध्ये राबविला जात आहे.प्रारंभिच्या काळापासूनच या कार्यक्रमाची सांगड सर्वसामान्य आरोग्य सेवांशी घालण्यात आली होती आणि क्षयरोग विषयक सेवांचे वितरण प्राथमिक सेवांच्या माध्यमातून करण्यात येत होते.
आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोचविण्यात आपण अग्रेसर आहोत.आरोग्य विभागाची यंत्रणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोचलेली आहे. त्यामुळे अनेक रोगाचे समुळ उच्चाटन करण्यात यश आले आहे.परंतु क्षयरोगावर अद्यापही पुर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही ही चिंताजनक बाब आहे.असे करुन आपण आपला इतरांचा जिव धोक्यात टाकत आहो कारण एक क्षयरुग्ण उपचाराविणा राहीला तर तो वर्षभरामध्ये त्याच्यासारखे पंधरा रुग्ण तयार करत असतो.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम उदिष्टये हे २०३० पर्यंत आपल्या भारतातून नष्ट करावयाचे असुन प्रत्येक नागरीकांनी क्षयरोगाविषयीची माहिती घेऊन त्याची जनजागृती करावी.
क्षयरोगाचे लक्षणे दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला,संध्याकाळी हलकासा ताप, वजनात घट होते,भूक मंदावने,छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसुन आल्यास क्षयरोगाचा संशयीत रुग्ण समजावा तसेच थुंकी दुशीत क्षयरोग रुग्णाच्या सहवासात असणारे व्यक्ती,कुपोषीत, प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती,मधुमेह असणारे व्यक्ती,दिर्घकालीन आजारी,वृध्द व्यक्ती इत्यादींना क्षयरोग आजार होण्याची शक्यता असते.
संपूर्ण देशात दररोज ५ हजार लोकांना क्षयरोगाची लागण होते आणि दर दिड मिनीटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो.तरुण व कमावत्या वर्गामध्ये या रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारावर येणाऱ्या रुग्णास दर महा १ हजार रुपये DBT स्वरुपात निक्षय पोषण योजनाव्दारे औषधोपचार पुर्ण होईपर्यंत देण्यात येतात.जेणेकरुन रुग्णांनी चांगले पौष्टीक आहार प्राशन करावा.सन २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये शासकिय रुग्णालय व खाजगी रुग्णालय मिळून एकूण २ हजार ७५ क्षयरुग्ण शोधुन काढण्यात आले व त्यांना औषधोपचार देण्यात आला.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना त्यांच्या वजनानुसार मोफत औषधोपचार पुरविल्या जातो.तसेच टिबीच्या निदानासाठी जिल्हा क्षयरोग येथे एलईडी सुक्ष्मदर्शी(LED) Microscope) अत्याधुनिक यंत्र व सिबीनेंट (CBNAAT)तसेच (Truenaat)यंत्र उपलब्ध असुन या यंत्राव्दारे निदान अवघ्या दोन तासात करणे शक्य झालेले आहे.क्षयरोग निदानाकरीता उपलब्ध असलेल्या या उपचार पध्दतीचा लाभ घेऊन गडचिरोली जिल्ह्याला भविष्यात क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने अविशांत पंडा जिल्हाधिकारी,गडचिरोली,सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ.प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प. गडचिरोली डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच डॉ.सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकारी,गडचिरोली यांनी केलेले आहे.
२४ मार्च २०२६ जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य खालील प्रमाणे आहे.
“Yes we can End TB”Led by Govt. of Maharashtra Powerd by Janbhagidari “
“होय आपण क्षयरोगाचा अंत करु शकतो” नेतृत्व महाराष्ट्र शासन जनभागीदारीच्या बळावर.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!