Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियावीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी; महिला तलाठीस रंगेहाथ पकडले..

वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी; महिला तलाठीस रंगेहाथ पकडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-हल्ली मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याने काहीजण वीटभट्टीचा व्यवसाय करून वा घरच्या बांधकामासाठी वीटभट्टी लावून गरज भासवतांना दिसून येतात.विशेष म्हणजे,वीटभट्टीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी महसूल विभागाकडून माती तसेच इतर परवानगी पूर्ण करून परवाना घेणे आवश्यक असल्याने एका ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी कर्मचारीने वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी केली. दरम्यान,तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली आणि तलाठीच्या घराजवळच रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले.गायत्री बोरकर वय ३८ वर्षे असे एसीबीने पकडलेल्या महिला कर्मचारीचे नाव असून सदरची कारवाई ही काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे करण्यात आली.
यातील तक्रारदार यांचा अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या अरततोंडी गाव परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय सुरू आहे.वीटभट्टीचा व्यवसाय सुरू असतांनाच तलाठी गायत्री बोरकर ह्या रविवार २२ मार्च रोजी तक्रारदारांच्या वीटभट्टीवर जाऊन ‘तुमचा परवाना कुठाय?’ परवाना नसल्याने तुमच्यावर अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची धमकी दिली.प्रसंगी तक्रारदार घाबरले असता परवाना नसल्याने दहा हजार रुपयांची मागणी बोरकर यांनी तक्रारदारास केली. प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी अंती गायत्री बोरकर यांना दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू  होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!