- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र दाणादाण उडाली होती.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गोसीखुर्द धरणामधुन वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता आज,गुरुवार ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता गोसेखुर्द धरणाच्या ३३ दरवाज्यांपैकी ९ वक्रदारे खुली करण्यात आली असून अंदाजे ९५० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा २०८ क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण अंदाजे ११५८ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन नदीपात्रात अवागमण करु नये व सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

