Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीआजच्या कृषी महोत्सवात तब्बल १ हजार १११ किलो नाचणीचा शिरा तयार करून...

आजच्या कृषी महोत्सवात तब्बल १ हजार १११ किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज,रविवारी एक ऐतिहासिक क्षण साकार झाला.प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १ हजार १११ किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला.या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्ये,विशेषतः नाचणी पिकाचे पोषणमूल्य आणि महत्त्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.
आदिवासी व दुर्गम भागातील पारंपरिक शेती आणि स्थानिक कृषी उत्पादनांना जागतिक ओळख मिळावी, हा या विक्रमामागील मुख्य हेतू होता.नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या या महाकाय शिऱ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे.या विक्रमासाठी वापरण्यात आलेली नाचणी ही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शाश्वत पद्धतीने उत्पादित करण्यात आली होती.
या ऐतिहासिक उपक्रमाच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून विशेष नियोजन करण्यात आले होते. शिरा तयार करतांना पाणी,गूळ,तूप,चारोळी, ड्रायफ्रुट्स आदी पारंपरिक व पौष्टिक घटकांचा वापर करण्यात आला.या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष उपस्थित राहून रेकॉर्ड संस्थांच्या प्रतिनिधींनी काटेकोर तपासणी केली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल,सहाय्यक जिल्हाधिकारी एम.अरूण यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी,कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी परंपरेला आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीला एक आगळीवेगळी ओळख मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश भरडधान्यांच्या पिकांना जागतिक ओळख देणे,त्यांचे पोषणमूल्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे प्रकल्प संचालक,आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले. ‘कोया कृषी कुंभ’मुळे गडचिरोलीच्या कृषी परंपरेचा जागतिक पटलावर ठसा उमटत असून, हा उपक्रम भविष्यातही प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!