Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीउद्याला अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम गडचिरोलीत..

उद्याला अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड.धर्मपाल मेश्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यासाठी उद्या,सोमवार ९ फेब्रुवारी व मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे.तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी मंजूर निधी,त्या निधीचा उपयोग, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या योजना व प्रत्यक्ष कामांची तपासणी करण्यात येणार आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी गडचिरोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन.त्यानंतर सकाळी ११ वाजता गडचिरोली नगरपरिषद,आरमोरी व देसाईगंज नगरपरिषद यांचा तसेच दुपारी १२.३० वाजता अहेरी,धानोरा,कुरखेडा,मुलचेरा,सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.यामध्ये लाड पागे योजना,दलित वस्ती सुधार योजना,घरकुल योजना,अनुकंपा प्रकरणे,तसेच सफाई कर्मचारी टेंडर व इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.
दुपारी २ वाजता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यासमवेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व खर्चाचा आढावा घेतील.रात्री गडचिरोली येथे मुक्काम व १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद गडचिरोली,दुपारी १ वाजता जिल्हा क्रीडा विभाग, २.३० वाजता आदिवासी विकास विभाग,दुपारी ३ वाजता महिला व बाल विकास विभाग आणि सायंकाळी ४ वाजता समाजकल्याण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.यावेळी संबंधित विभागांकडून मागील पाच वर्षांचा खर्च,प्रगती अहवाल व योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!