Sunday, October 4, 2026
Homeमुंबईआजचे मंत्रीमंडळ निर्णय; बायोगॅस धोरण व जमीन नियमातील बदलासह शिक्षकांसाठी मोठी घोषणा..

आजचे मंत्रीमंडळ निर्णय; बायोगॅस धोरण व जमीन नियमातील बदलासह शिक्षकांसाठी मोठी घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्य मंत्री मंडळाच्या वतीने आज,बुधवार २२ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळ बैठक पार पडली.बैठकीत चार महत्वाचे धडाकेबाज निर्णय घेण्यात आले असून नगर रचना विकास विभागाच्या वतीने चालू वर्षात महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६ जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, साताऱ्यात नवा आयटी पार्क,शिक्षकांसाठी आणि जमिनी संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बायोगॅस धोरण २०२६ जाहीर(नगर  विकास विभाग):-वाढता कचरा आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६’ ला मान्यता देण्यात आली आहे.चालू वर्षासाठी तब्बल कोटींची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती नेमली जाणार आहे.सदरचे प्रकल्प पीपीपी आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार असून,यामुळे हरित गृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.
शिक्षकांसाठी मोठी घोषणा(शिक्षण विभाग):-
राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे.तसेच,या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पद भरतीमध्ये अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे,ज्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग सुकर होईल.
जमिनीच्या नियमात बदल(महसूल विभाग):-
कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.या संदर्भातील नवीन अधिसूचना काढण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.
साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन
(महसूल विभाग ):-सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.यासाठी एमआयडीसीला म्हणजेच औद्योगिक प्रकल्पासाठी ४२.५५ हेक्टर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!