Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीआईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडले होते.परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने बचाव मोहीम राबवत तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी वय ४० वर्षे,अर्चना केये कुडयामी वय १६ वर्षे आणि अक्षरा केये कुडयामी वय ३ वर्षे, सर्व रा.लाहेरी,ता.भामरागड, जि.गडचिरोली यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दोन चिमुकल्या व त्यांची आई काल बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते.दरम्यान,सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पामुलगौतम नदी व परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पूर आला.त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने तिघेही नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले.
सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता.पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते.परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
सायंकाळी सुमारे साडे सहा वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली.घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना देण्यात आली.त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचावकार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान मुसळधार पाऊस,अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली.अथक प्रयत्नांनंतर तिन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले.
या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकाने,लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि जिल्हा प्रशासन,महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे सदरची जीव वाचविणारी मोहीम यशस्वी ठरली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!