Tuesday, April 21, 2026
Homeब्रम्हपुरीआईचा मानलेला भाऊ मुलीला लग्नाला लावायचा तगादा; नकार देताच डोक्यावर हातोडीने केले...

आईचा मानलेला भाऊ मुलीला लग्नाला लावायचा तगादा; नकार देताच डोक्यावर हातोडीने केले वार- ब्रम्हपुरी येथील घटना; तरुणास अटक  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी येथील कॉलेज रोडवरील लक्ष्मीनारायण मंदीराजवळ एका तरुणीचा हतोडीने खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला ब्रह्मपुरी पोलिसांनी पकडून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार ८ मार्चला म्हणजे जागतिक महिलादिनी दुपारी २ दरम्यान पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत ब्रह्मपुरीवरून बोंडेगावकडे जात असताना कॉलेज रोडवर असलेल्या लक्ष्मीनारायण मंदीराजवळ आरोपी लवेश वामन देउळकर रा.नान्होरी याने आपल्याजवळील हतोडीने युवतीचा जीव घेण्याच्या विचाराने तीच्या डोक्यावर वार करून जखमी केले.मात्र,जवळपास उभे असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत त्यास पकडून घेतले.पोलिसांना याबाबत माहिती दिली असता ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सचिन बारसागडे हे त्याच भागात असल्याने त्यांनी लगेच घटनास्थळी जाउन आरोपीस ताब्यात घेतले. 

पीडित मुलीची वैद्यकिय उपचारानंतर तिने पोलिस ठाण्यात येउन तक्रार दिली.त्यात आरोपी हा तिचे आईचा मानलेला भाऊ असून तीला वेगवेगळ्या नंबरवरून वांरवार फोन करून त्रास देउन लग्नाची मागणी घालत होता.परंतु तीची आई त्याला भाउ मानत असल्याने तीने नकार देउन फोन न करण्याबाबत वारंवार बजावले होते.त्यामुळे त्या रागातून त्याने तीचेवर जिवघेणा हल्ला केलेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पीडीत मूलीचे तक्रारीवरून आरोपीविरूध्द कलम ३०७, ३५४ (ड) भा.दं.वि.सहकलम ३(२) (व्ही) अ.जा.अ.ज.अ.प्र.का.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास मल्लीकार्जून इंगळे सा. उप विभागीय पोलिस अधिकारी कार्या.मूल अतिरिक्त कार्यभार ब्रम्हपूरी हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!