नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतांनाच सदरचा प्रकार घडला.पथकाने तात्काळ बोटीच्या साहाय्याने त्यांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.सुर्देश गोरखनाथ वय १६ वर्षे व सिद्धीनाथ गोरखनाथ वय २० वर्षे अशी बचावलेल्या युवकांची नावे असून दोघेही कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.सध्या नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्साह असल्याने देशभराच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी तसेच इतर नागरिकांनी रेलचेल आहे.अश्यातच कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान,अंबाझरी तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल येथील एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतांना आंघोळीसाठी दोन युवक तलावात उतरले. युवक बुडत असतांनाच उपस्थित नागरिकांनी बुडाले-बुडाले असल्याचा आवाज केला.त्याचवेळेस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता बोटीच्या साहाय्याने युवकांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. सिद्धनाथ गोरखनाथ हा शुद्धीत होता,तर सुर्देश गोरखनात यास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले आणि प्रथमोपचार देऊन त्याला शुद्धीत आणले व रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने त्यांना खासगी वाहनाने मेओ हॉस्पिटल येथे रवाना केले.
आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

