उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- उपायुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र,मुंबई यांचे आदेशान्वये,६ एप्रिल २०२३ अन्वये निधन,राजीनामा,अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून
अहेरी तालुक्यातील पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती समाविष्ठ आहेत 👇
ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र.५ अनु. जमाती स्त्री राखीव),पल्ले(प्रभाग क्र.१ अनु.जमाती स्त्री राखीव व प्रभाग क्र.३ अनु. जमाती), व्येंकटरावपेठा (प्रभाग क्र.२ अनु.जमाती स्त्री राखीव), रेगुलवाही (अनु. जमाती) व मेडपल्ली (अनुसूचित जमाती) इत्यादी.
प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे👇
निवडणूकीचे टप्पे तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक १८ एप्रिल २०२३ (मंगळवार),नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी) दिनांक २५ एप्रिल २०२३ (मंगळवार) ते दिनांक २ मे २०२३ (मंगळवार) वेळ सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंत (दिनांक २९ एप्रिल २०२३ शनिवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रविवार व दिनांक १ मे २०२३ ची सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी) दिनांक ३ मे २०२३ (बुधवार) वेळ सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत,नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (मंडळ कार्यालय इमारत तहसिल कार्यालय,अहेरी)- दिनांक ८ मे २०२३ (सोमवार) वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत,निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ८ मे २०२३ (सोमवार )व वेळ दुपारी ३ वाजेनंतर,आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक १८ मे २०२३ (गुरुवार) सकाळी ७.३० वा.पासून ते दुपारी ३ वा.पर्यंत.
अहेरी तालुक्यातील पोटनिवडणूकांसाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत आचारसंहिता लागु राहील.संभाव्य उमेदवारांना पारंपारीक पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे असल्याने कार्यालयातून नामनिर्देशन पत्र प्राप्त करुन परिपूर्ण भरुन स्वाक्षरी/अंगठा करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे.उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी नामनिर्देशपत्र, मत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतचे घोषणापत्र,आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०-१ अ (१) नुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविणा-या व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाच्या घोषणापत्रातील कोणत्याही रकान्याची माहिती कोरी न ठेवता संपूर्ण रकान्याची माहिती भरणेत यावी.ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवारांने करावयाच्या खर्चाची सुधारीत मर्यादा सदस्य संख्या ७ ते ९करिता २५,००० रूपये,११ ते १३ सदस्य संख्या करीता ३५,००० रूपये व १५ ते १७ सदस्य संख्या
करीता ५०,००० आहे.नामनिर्देशन पत्रासोबत अनु.जाती किंवा अनु.जमाती यांच्यासाठी राखीव जागेकरीता रूपये १०० (अक्षरी- रूपये शंभर फक्त) व सर्वसाधारण जागेकरीता रूपये ५०० (अक्षरी- रूपये पाचशे फक्त ) एवढी अनामत रक्कम रोखीने भरणे अनिवार्य आहे.ग्रामपंचायत नागेपल्ली,पल्ले,व्येंकटरावपेठा,रेगुलवाही व मेडपल्ली येथिल रिक्त सदस्य पदाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करणा-या उमेदवाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार दुस-या प्रभागातील मतदार असल्यास त्याबाबतचा उत्तारा सोबत जोडणे आवश्यक आहे.केंद्र व राज्य शासनाकडून कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता घेण्याबाबतच्या सूचना/निर्बंध लागू झाल्यास मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.असे तहसिलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी अहेरी यांनी कळविले आहे.