- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्वत्र चेक पोस्ट उभारून अवैध वाळू वाहतुकीला अटकाव केला आहे. अश्यातच काही मुजोर रेती तस्कर पैश्याच्या जोरावर बेधडकपणे अजूनही अवैध रेतीची वाहतूक करतांना दिसून येत आहेत.रेती तस्कर तसेच त्यांना साथ देणारे अधिकारी,कर्मचारी यांना शासनाच्या महसुलात वाढ व्हावी,असे कदापिही वाटत नसल्याने ‘आम भरो पोट भरो’ अशी हल्ली अवस्था निर्माण झाली आहे.त्यामुळे
आरमोरी विधानसभा क्षेत्रात विशेष करून देसाईगंज व आरमोरी तालुक्यात अवैध रेती उत्खननाचे प्रमाण वाढले असून,त्यामुळे पर्यावरणीय हानीबरोबरच शासनाच्या महसुलालाही फटका बसत आहे.या अनियमिततेविरोधात त्वरित कार्यवाही व्हावी,यासाठी आमदार रामदास मसराम यांनी मुंबईच्या मंत्रालयात जाऊन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली.सोबतच जिल्ह्यातील आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी,अशी ठोस मागणी केली.अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे नोंदणीस विलंब झाल्याने,त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये म्हणून ही मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.या दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देतांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना आवश्यक ती कार्यवाही व सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे आमदार मसराम यांनी कळवले.
- Advertisement -

