Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीअवघ्या ४८ तासांतच खुनाचा उलगडा; मुलगाच निघाला मारेकरी.. - गडचिरोली जिल्ह्यातील घटना..

अवघ्या ४८ तासांतच खुनाचा उलगडा; मुलगाच निघाला मारेकरी.. – गडचिरोली जिल्ह्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.घरगुती वादातून झालेल्या भांडणात चक्क मुलानेच वडीलास संपविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अवघ्या ४८ तांसातच आष्टी पोलिसांनी खुनाचा उलगडा करून मारेकरी मुलास व यात सहकार्य करणाऱ्या एकास ताब्यात घेत अटक केली आहे.रेवनाथ लक्ष्मण कोडापे वय ५५ वर्षे रा.मार्कंडा देव, ता.चामोर्शी,जि.गडचिरोली असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे.तर खुनी आरोपी मुलगा आकाश कोडापे व सहकारी लखन देवराव मडावी यांस अटक केली आहे.
माहितीनुसार,दोन दिवसांपूर्वी आष्टीपासून जवळ असलेल्या बामणपेठ गावातील जंगल परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.सदरची माहिती गावातील पोलिस पाटील भाऊजी सिडाम यांनी आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना दिली.पोलिस निरीक्षक विशाल काळे पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले.मृतदेह सडक्या अवस्थेत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.त्यानंतर आष्टी पोलिसांनी केलेल्या तपासात सदरचा मृतदेह रेवनाथ लक्ष्मण कोडापे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आष्टी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले.अवघ्या ४८ तासात संपूर्ण गुन्ह्याचा तपास करत मुलगा आकाश कोडापे हाच खुनी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.अशातच पोलिसांच्या भितीने आकाशने पळ काढण्याचा प्रयत्न केला व आपण आपल्याच वडिलांना मारल्याच्या नैराश्यातून त्याने चिचडोह बॅरेज प्रकल्पात आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याची माहिती आहे.मात्र,आष्टी पोलिसांनी त्याला अटक करून आज,शुक्रवारी २ मे रोजी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेत आरोपीच्या मदतीला लखन देवराव मडावी हा सुद्धा उपस्थित असल्याने त्यालासुद्धा आष्टी पोलिसांनी अटक केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास अहेरी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल काळेसह पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!