Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडेंना वारंवार अश्लील मॅसेज व त्रास देणाऱ्यास...

मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडेंना वारंवार अश्लील मॅसेज व त्रास देणाऱ्यास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पशुसंवर्धन,पर्यावरण आणि हवामान बदल कॅबिनेट मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडेंना यांना बऱ्याच दिवसांपासून वारंवार अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या आणि सतत फोन कॉल करून त्रास देणाऱ्याला आज,शुक्रवारी २ मे ला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.२५ वर्षीय अमोल काळे असे अश्लील मॅसेज व त्रास देणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्याच्या परळी येथील रहिवासी आहे.सध्या तो शिक्षण घेण्यासाठी पुण्यात वास्तव्यास होता.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून अमोल काळेला बेड्या ठोकल्या असून पंकजा मुंडेंना  काही दिवसांपासून सातत्याने त्रासदायक कॉल आणि आक्षेपार्ह मॅसेज येत होते.याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक २६ वर्षीय निखिल भामरे यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे तक्रार दाखल केली होती.त्यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली.निखिल भामरे याच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपी अमोल काळेला पुण्यातील भोसरी येथून ताब्यात घेतले.अमोल काळेच्या विरोधात सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.आरोपी काळे याने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याला आज शुक्रवारी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!