Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअभ्यासाशिवाय पर्याय नाही; दहावी,बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरे..

अभ्यासाशिवाय पर्याय नाही; दहावी,बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक विभागीय मंडळस्तरावर संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे.गैरप्रकार होऊ नये, यासाठी लक्ष देण्यात येणार आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.त्यातच, गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी,बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत.त्यामुळे,विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.मागील शैक्षणिक वर्षात दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता कॉपी करून पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला असता अनेकजण परीक्षेला मुकले होते.त्याचबरोबर, सदर परीक्षा केंद्रांना कारवाईला सामोरे जावे लागले होते.यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.तर,त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. तसेच दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे.तर,तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.यंदा जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!