- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो जी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे.या संस्थेने देशभरातील भ्रष्टाचाराचा अहवाल जाहीर केला आहे.यात महाराष्ट्र राज्य देशात भ्रष्टाचारात अव्वल स्थानावर असल्याने काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज,शुक्रवार ३ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधत उपरोधिक टोला लगावला आहे.महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार एवढा चकचकीत आहे की,देशात महाराष्ट्राने भ्रष्टाचारात शिखर गाठले आहे.देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत असतांना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. २०२३ मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरला असल्याचे एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे.२०२३ मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची १ हजार १३९ प्रकरणे समोर आली.त्यातील तब्बल ७६३ प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.एनसीआरबी अहवालानुसार देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि ते देखील सलग तीन वर्ष ही कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.म्हणजे उत्तर प्रदेशला पण महाराष्ट्राने मागे टाकले आहे.स्वच्छ आणि पारदर्शक कामाचा ढोल बजावणाऱ्यांना त्यांच्या कारभाराचे सरकारी प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यामुळे अभिनंदन महाराष्ट्र सरकार,जोरदार प्रगती,असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
- Advertisement -

