उद्रेक न्युज वृत्त :-कित्तेक गाव खेड्यात गावठी मोहफुलाची दारू ‘स्वस्तात-मस्त’ मिळत असल्याने तळीरामांचा कल मोहफुलाच्या दारुकडे वाढलेला दिसून येतो.एकदा दारू अंगात गेली की,काहींची शब्द रचना बदलत असते; तर काहींच्या बोली भाषेत फरक पडत असतो.अशातच काहीजण कधी-कधी घरचा रस्ताही विसरून जातात.असाच घरचा रस्ता एका बिबट्याने विसरला असल्याची घटना छत्तीसगड राज्यातील धमतरी येथे घडली आहे.
गावाशेजारील जंगलात हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू होते.इतक्यात तेथे अचानकपणे बिबट्याने उडी मारली.मग काय…काही जण लपून बसले तर काही जणांनी लडखडत तेथून धूम ठोकली.पण खरा गोंधळ तर पुढेच झाला.भट्टीवर असलेली दारू बिबट्याने पाणी समजून पिली.दारू पिल्यानंतर काही वेळातच बिबट्या नशेत टुल्ल झाला.हातभट्टीने आपला गुण दाखवलाच. बिबट्या चालताना लागला लडखडायला.त्याला जंगलाचा रस्ताही नीट आठवेना. लपून बसलेल्यांनी हा प्रकार पाहिला.बिबट्याचे आता तळीराम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांची भीती मोडली.त्यांनी चक्क बिबट्याच्या पाठीवर हात फिरवून रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला.तर काहींनी त्याच्या गळ्यात हात घालून सेल्फी घेतली. पण,शेवटी त्याला जंगलाच्या दिशेने नेऊन सोडले.आधी बिबट्याला पाहिले तेव्हा काही जणांची बोबडी वळली होती; पण आता धडपडत चालणाऱ्या बिबट्याला पाहून मात्र प्रत्येकाची हसून-हसून मुरकुंडी वळली होती.