Sunday, June 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् त्याने लाच म्हणून चक्क ५ किलो बटाट्यांची केली मागणी..अखेर झाला निलंबित...

अन् त्याने लाच म्हणून चक्क ५ किलो बटाट्यांची केली मागणी..अखेर झाला निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली नवनवीन फंडे वापरून लाचेची मागणी करण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांपासून पोलीसांच्या माध्यामातून लाच मागण्याच्या घटना सोशल मीडियामुळे उघडकीस आल्या आहेत.अशीच घटना काही दिवासंपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली असून,पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे चक्क ५ किलो बटाट्यांची मागणी केली.सोशल मीडियावर ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे.
राम कृपाल सिंह असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे
नाव आहे.उत्तर प्रदेशातील कन्नौज पोलीस स्टेशनमध्ये तो तैनात होता.लाच म्हणून राम कृपाल सिंह याने
शेतकऱ्याकडून ५ किलो बटाट्यांची मागणी केली.
परंतु शेतकऱ्याने त्याची मागणी फेटाळत २ किलो
बटाटे देण्याची तयारी दर्शवली.त्यानंतर दोघांमध्ये
वाद झाला आणि शेवटी ३ किलो बटाटे घेण्यास राम
कृपाल सिंह तयार झाला.घडलेल्या घटनेची ऑडियो
क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यानंतर राम कृपाल सिंह या लाचखोर पोलीस
अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
कन्नौज पोलिसांनी सखोल चौकशी केली असता
“बटाटा” हा शब्द फक्त एक कोडवर्ड म्हणून वापरण्यात आला होता.त्यामुळे पोलिसांनी राम कृपाल सिंह यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कन्नौज पोलिसांनी द्वीट करत याची माहिती दिली.तसेच पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!