- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-चोरी करणारा चोर हा कधीच विचार करत नाही की,समोरील व्यक्ती आहे तरी कोण? त्याला त्याच्याशी कसलेही देणे-घेणे नसतेच.त्यामुळे ‘अपणा काम बनता’ असाच विचार त्याच्या मनात असतो व पुढील प्रयत्न जारी ठेऊन ‘साधली तर चेल्याची नाही तर चपाट्याची’ असे करीत असतो.अशातच असाच काहीसा प्रकार काल शनिवारी गोंदिया शहरातील मनोहर चौकात असलेल्या जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडला.एका अज्ञात चोरट्याने चक्क वाहतूक पोलिस नियंत्रण कार्यालयाच्यासमोर असलेल्या पार्किंगमधून वाहतूक विभागाच्याच कर्मचाऱ्याची दुचाकी चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली.चक्क पोलिस कार्यालयासमोरूनच दुचाकी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बेशिस्त वाहतुकीवर लगाम लावण्याच्या उद्देशाने गोंदिया शहराच्या मनोहर चौकात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. याठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्यातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येते.या कार्यालयात आफरीन सलाउद्दिन शेख वय २९ वर्षे,रा.शिवाय कॉलोनी आंबाटोली फुलचूर हे कार्यरत आहेत.त्यांनी काल शनिवार १२ एप्रिल रोजी कार्यालयाच्या समोरील भागात असलेल्या पार्किंगमध्ये दुचाकी क्रमांक-एमएच १६,बीक्यू ११५१ ठेवली होती.त्यातच काही कालावधीनंतर त्या ठिकाणाहून दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली.चक्क वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याच्याच दुचाकीवर चोट्याची नजर होती कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -

