Wednesday, September 9, 2026
Homeगोंदियाअन् त्यांनी चक्क पोलिस शिपायालाच ५१ लाख रुपयांना लावली चपात….

अन् त्यांनी चक्क पोलिस शिपायालाच ५१ लाख रुपयांना लावली चपात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष देत चक्क पोलिस शिपायालाच तब्बल ५० लाख ६० हजार रुपयांची चपत लावण्यात आल्याचा प्रकार डुग्गीपार येथे उघडकीस आला  आहे.

आरोपी ब्लॅक रॉक इक्विटी असेट मॅनेजमेंट ग्रुप ६०२ च्या व्हॉट्सअपमधील ग्रुप ॲडमिन आदींनी इंटरनेटवरून फिर्यादी पोलिस शिपाई श्रीकांत भोजराज मेश्राम वय ३५,नेमणूक पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना शेअर मार्केट संबंधात अनुभवी तज्ज्ञ असल्याचे भासवून शेअर मार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल असे आमिष दिले.तसेच, श्रीकांत मेश्राम यांना शेअर मार्केट संबंधात बनावट लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करावयास लावले. त्याद्वारे आयपीओची माहिती त्यांना देऊन वेगवेगळ्या बैंक अकाउंटवर वेगवेगळे कारण सांगून पैसे पाठविण्यास लावले.अशा प्रकारे श्रीकांत मेश्राम यांची ५० लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडलेल्या या प्रकारात श्रीकांत मेश्राम यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी भादंवि कलम ४२०, सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!