उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून युवा वीर मराठा मंडळातर्फे सार्वजनिकरित्या दोन दिवसीय शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१८ फेब्रुवारीला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले; तर १९ फेब्रुवारी ला सायंकाळच्या सुमारास शिवरायांची भव्य-दिव्य मिरवणूक गावातील दुर्गा माता मंदिर परिसरा पासून ते संपूर्ण गावामध्ये काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये माता जिजाऊ,बालक शिवराय, मोठे शिवराय यांची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढविण्यात आली.त्याच्रमाणे गावातील छोटी-मोठी लहान मुले-मुली,युवक,युवती, महिला वर्ग,पुरुष वर्ग,वयोवृद्ध,आबालवृद्ध सर्वजण मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर थिरकत होती. डीजेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्या बरोबरच डॉ.बाबा साहेब आंबेडकर व इतर गाण्यावरही गावातील जनता थिरकुन जयघोषाचे नारे देत होती.संपूर्ण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की,जय; डॉ.बाबा साहेब आंबेडकर की,जय; अश्या प्रकारे जयघोषाचे नारे गुंजत होते.

शिवरायांच्या जयंती मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे कोंढाळा ग्रामपंचयतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत ह्या माता जिजाऊ बनल्या होत्या; तर बाल पणातील शिवराय देवांश तुपट आणि तरुण पणातील शिवराय दिनेश मैंद बनले होते.गावातील सरपंचा उच्च शिक्षित,मनमिळावू,दयाळू,ना कुणा विषयी द्वेष,ना आक्षेप,ना उजर-तक्रार,सर्वांप्रती आदर; अशा विवीध गुण संपन्न स्वामित्वाच्या धनी असल्याने गावातील कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम वा उपक्रम असोत; त्यामधे स्वतः पुढाकार घेऊन हिरी-हिरीने भाग घेत असतात.