उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि.२२ जुन २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून पेरमिलीकडे मोटारीने प्रयाण.सकाळी १०.३० वाजता पेरमिली येथे आगमन व ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी ११ वाजता महसुल भवन,पेरमिली येथे अहेरी तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी २ वाजता पेरमिली येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी ३ वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन.दुपारी ३ ते ४ राखीव,दुपारी ४ वाजता अहेरी येथील ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ४.३० वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दि.२३ जुन रोजी सकाळी ९ वाजता राजवाडा निवासस्थान,अहेरी येथून कारसपल्लीकडे मोटारीने प्रयाण.सकाळी ११ वाजता कारसपल्ली येथे आगमन व ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी १२ ते १ राखीव.दुपारी १ वाजता कारसपल्ली येथून सिरोंचा मार्गे हैद्राबादकडे प्रयाण.

