Thursday, October 8, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक; चिमुकलीचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक; चिमुकलीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
 चंद्रपूर :-अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अवघ्या सहा वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,तर आई-वडील व लहान बहिण जखमी झाल्याची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोंडपिपरी-वढोली मार्गावर घडली. अपघातात ६ वर्षीय आयुषी विपुल नागपुरे रा.सोमनपल्ली,ता.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
विपुल नागपुरे हे पत्नी,मोठी मुलगी आयुषी व लहान मुलीसह दुचाकीने जात असतांना वढोली मार्गावर येताच त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली.धडकेत नागपुरे दाम्पत्य खाली कोसळले. यात आयुषीला गंभीर दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.लागलीच आयुषी तिचे आई-वडील व लहान बहिणीला तातडीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,मात्र उपचार सुरू असतांनाच आयुषीचा मृत्यू झाला.अपघातात जखमी झालेल्या पालक व लहान बहिणीची प्रकृती स्थिर असून
पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली आहे,तर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!