Saturday, June 13, 2026
Homeपुणेअज्ञात इसमांनी तहसीलदारांवर चढवला हल्ला..-गाडीवर मारला लोखंडी रॉड आणि डोळ्यात टाकले तिखट…

अज्ञात इसमांनी तहसीलदारांवर चढवला हल्ला..-गाडीवर मारला लोखंडी रॉड आणि डोळ्यात टाकले तिखट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

इंदापूर(पुणे) :- इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.इंदापूर शहरातील संविधान चौकात हा प्रकार घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आज,शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला चढवला.

सोबतच खाल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती; ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यामध्ये शासकीय गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत.या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुका परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!