- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,आज जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांचीच नावे असल्याचे समोर आले आहे. यात नागपूर जिल्हा बँक,पुणे जिल्हा बँक,ठाणे जिल्हा बँक,लातूर जिल्हा बँक,सातारा जिल्हा बँक आणि अमरावती जिल्हा बँकेचे मिळून ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.यादीचे अपलोडींग करणे सुरू आहे. जे शेतकरी आयकरमध्ये(इन्कम टॅक्स)बसत नाहीत, अश्या शेतकऱ्यांचीच पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.इन्कम टॅक्सची यादी येताच पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असून काही तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागत आहे; असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माहिती देतांना स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर,महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांना देखील २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल.३६ हजार ५८५ कोटी आणि १२ लाख शेतकऱ्यांचे ४ हजार ३९५ कोटी मिळून ४० हजार ९८० कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून प्रातिनिधिक पद्धतीने आज कर्जमाफीतील पात्र असलेल्या ५५३ शेतकऱ्यांच्या नावांची यादी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून शासनाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. कर्जमाफीची यादी संबंधित बँका आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ देण्यात येणार आहे.त्यातच,कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फॉर्मर आयडी, आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक प्रणालीवरील नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- Advertisement -

