- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवताळा येथे मुख्याध्यापक पदावर असलेले पराग नानाजी पुडके हा नकली मुख्याध्यापक असल्याची बाब समोर आली आहे.महत्वाचे म्हणजे,मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतांना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसतांना डायरेक्ट २०१० मध्ये मुख्याध्यापक बनविण्यात आले.मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक,माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.या प्रकरणांमध्ये नागपूरच्या सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना रात्री गडचिरोलीतून ताब्यात घेतले.तसेच प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके,रा.जेवताळा, ता.लाखनी,जि.भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले.अशातच आज,शनिवार १२ एप्रिल रोजी दोघांनाही नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह मुख्याध्यापक पराग पुडके यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा झाला भांडाफोड👇
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.मुन्ना वाघमारे हे २०१० पासून नानाजी पुडके शाळेत रंगरंगोटीचे काम करतात.काही महिन्यांपूर्वी ते केंद्रीय शासकीय शाळेत गेले असता तेथील शिक्षक कर्मचारी पराग नानाजी पुडके यांना चुकीच्या पद्धतीने मुख्याध्यापक बनविल्यासंदर्भात चर्चा करतांना दिसले.या बाबीची विस्तृत माहिती घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.याच पेंटर मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नागपूर पोलिसांनी नरड आणि पराग पुडके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -