Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरअखेर विजय वडेट्टीवार वर्सेस प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहाचा समारोप..

अखेर विजय वडेट्टीवार वर्सेस प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहाचा समारोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन आमदार विजय वडेट्टीवार वर्सेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात अंतर्गत वाद सुरू होता.अश्यातच आता वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहाचा समारोप दिल्ली दरबारी झाल्याचे समोर आले आहे.दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर आज,गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी त्यावर तोडगा निघाला आहे.त्यानुसार,चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौरपद धानोरकर गटाकडे,तर उपमहापौरपदी वडेट्टीवारांच्या समर्थकांना संधी मिळणार आहे.
चंद्रपूर वादावर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, ‘महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार खासदार प्रतिभा धानोरकर आणि गटनेता राजेश अरुण म्हणतील तो महापौर होईल.’ पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘काँग्रेसचे गटनेता म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उपमहापौरपदी आमचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे.मात्र,आम्ही महापौर पदाचा अर्ज भरला नाही.तर धानोरकरांकडून चार महिलांनी अर्ज भरलेत.आज संध्याकाळी काँग्रेसची गटनोंदणी होणार आहे.’ दरम्यान,या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सत्तेत वाटा मिळणार आहे. स्थायी समिती शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात देण्याचे ठरले आहे.सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे ३ नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत.त्यांना एमआयएम पक्षाने पाठिंबा दिल्याने ते १ नगरसेवक जनविकास सेनेबरोबर आहे.बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या ३२ चे संख्याबळ असून अजून २ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे,असेही वडेट्टीवार म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!