Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; एप्रिल महिन्याचे १५०० रुपये येणार खात्यात..

अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; एप्रिल महिन्याचे १५०० रुपये येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे २ कोटी ४७ लाख लाभार्थी असून आता पर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे नऊ हप्ते म्हणजेच १३ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच एप्रिल महिना संपूनही खात्यात रक्कम जमा करण्यात आली नसल्याने पंधराशे रुपये कधी होणार जमा? याकडे लाडक्या बहिणी टक लावून बसल्या होत्या.त्यातच
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अक्षय्य तृतीयेच्या औचित्यावर बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होतील,असे जाहीर केले होते.मात्र एप्रिल महिना संपूनही अद्याप महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.अशातच आता यासंदर्भात अदिती तटकरेंनी त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी,पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे व पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात थेट निधी प्राप्त होईल,त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलीच म्हणावे लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!