Thursday, April 30, 2026
Homeनागपूरअखेर नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानला जामीन मंजूर..

अखेर नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानला जामीन मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवार १७ मार्च २०२५ रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीम खान सह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.फहीम खान वर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.दंगल उसळली व दगडफेक,तोडफोड, जाळपोळ करून शांत असलेल्या राज्याच्या उपराजधानीला गालबोट लागले.त्यामुळे मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खान वय ३८ वर्षे याच्या अडचणी सातत्याने वाढत होत्या.फहीम खान नागपूर शहराच्या संजयबाग कॉलनी येथील रहिवासी असून तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्हे दाखल करून न्यायालयात  दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. बऱ्याचवेळा त्याच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला होता.मात्र,जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता.अश्यातच आज,शुक्रवार ११ जुलै रोजी फहीम खान याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.येत्या सोमवारनंतर तो कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सत्र न्यायालयात फहीम खानच्या वकिलांनी, दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे त्याला आता तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही,असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने फहीम खानला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.न्यायालयाने जामीन देतांना काही अटी व शर्तीही घातल्या आहेत.त्यानुसार,फहीम खानला आता आठवड्यातून दोनदा,म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.तसेच,प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!